यंत्रमागाचे मॅनचेस्टर असलेल्या मालेगांव शहर व मालेगांव तालुक्यातील आर्थिक क्षेत्रातील नाडी समजली जाणारी नाशिक जिल्ह्यातील अग्रणी सहकारी बँक मामको बँकेची स्थापना दि.०२ ऑक्टोंबर १९६२ रोजी महात्मा गांधी व लाल बहादुर शास्त्री यांच्या जयंतीच्या सुमुहूर्तावर झाली. स्व. मा. लालचंदजी हिराचंद दोशी यांचे अध्यक्षतेखाली व मा. अर्थमंत्री महाराष्ट्र राज्य श्री. स. गो. बर्वे यांचे हस्ते उद्घाटन झाले. कार्यक्रमास वै. व्यंकटराव हिरे, वै. दादासाहेब पोतनीस प्रमुख अतिथी होते. आ. साबीर सत्तार शेठ, काशीनाथ शेठ, मंगलदास भावसार तसेच भागचंदजी लोढा हे कार्यक्रमास उपस्थित होते. हरिलाल भिलाशेठ आस्मर मुख्य प्रर्वतक व संस्थापक होते. तसेच बँक स्थापनेची प्रेरणा वै. मा. भाउसाहेब हिरे यांची होती.
 

मामको बँकेच्या स्थापनेपुर्वी मालेगांव शहरात फक्त २-३ खाजगी बँका होत्या. मालेगांव शहरातील प्रमुख रंगीत साडी व कापड व्यवसाय व तालुक्यातील शेती व्यवसाय हे प्रमुख व्यवसाय होते. त्यावेळी अस्तित्वातील बँकाकडून लहान उद्योजक, व्यापारी व शेती तसेच माध्यम वर्गीय करीता पतपुरवठा पुरेसा होत नसे तसेच मध्यम व लहान ठेवीदारांकरीता बँकींग व्यवसाय निगडीत नव्हता. समाजातील आर्थिक गरजा पूर्ण करण्यासाठी उद्योजकांना व व्यावसायीकांना जास्तीत जास्त बँकींग सुविधा मिळणेसाठी शहरातील काही विचारवंत व्यवसायिकांनी शहरात सहकारी बँक सुरू करण्याचे ठरविले व त्यातुन दि. मालेगांव मर्चन्टस् को. ऑप. बँकेची स्थापना झाली.
 

श्री.हरिलाल भिलाशेठ आस्मर, वै. अहमद हाजी अब्दुल करीम व श्री. केशरीचंदजी संपतराज मेहता हे मुख्य प्रवर्तक होते व प्रथम संचालक मंडळ म्हणून-
१) श्री. हरिलाल भिलाशेठ आस्मर
२) श्री. अहमद हाजी अब्दुल करीम
३) श्री.केशरीचंद संपतराज मेहता
४) श्री.कृष्णाजी बळवंत गुंजाळ
५) श्री. आनंदा धर्मा जगताप
६) श्री. पुंडलीक सुपडू पाटील
७) श्री. नामदेव एकनाथ सुपेकर
८) श्री. नथु श्रीधरशेठ वाणी
९) श्री. लक्ष्मीनारायण रामलाल मुंदडा
चेअरमन
व्हा. चेअरमन
संचालक
संचालक
संचालक
संचालक
संचालक
संचालक
संचालक


 ४१ सभासद व ४१००० भागभांडवल व फक्त रू.४४३१/- ठेवींवर सुरूवात झालेल्या मामको बँकेच्या प्रगतीचा आलेख आजतागायत उंचावत असुन ०२ ऑक्टोंबर २००६ रोजी बँकेस ४४ वर्ष पुर्ण झाले. १९८७ रौप्य महोत्सव ना.मुख्यमंत्री शंकररावजी चव्हाण यांचे हस्ते वै. रामकृष्णजी बजाज यांचे अध्यक्षतेखाली कार्यक्रम संपन्न प्रमुख अतिथी श्रीमती पुष्पाताई हिरे, कुसुमताई चव्हाण, रत्नाप्पा कुभार, निहाल अहमद, आमदार त्यावेळी चेअरमन श्री.हरिलाल भिलाशेठ आस्मर यांचा मुख्यमंत्री यांचे हस्ते सत्कार झाला. त्यावेळी सर्व सभासदांना चांदीचे ग्लास भेटवस्तु देण्यात आली व रू. दोन लाख फ़ंड काढुन त्यातुन मामको जनकल्याण ट्रस्टची स्थापना करण्यात आली. संस्थापक चेअरमन हरिलाल आस्मर, व्हा. चेअरमन शंकरराव लिंगायत होते.
 

या दरम्यान बँकेचे कामकाज वाढत होते व सभासद ठेविदारांचा बँकेवरचा विश्वास वाढत गेला. ग्राहकांच्या अग्रहास्तव व कामकाजात सुसूत्रता येणेसाठी शहराच्या विविध भागात बँकेच्या शाखा सुरू करण्यात आल्या. बँकेचे रौप्य महोत्सवी वर्ष सन १९८७ बँकेने स्वत:च्या मालकीची भव्य वास्तु उभारली त्यास मामको भवन असे नांव देण्यात आले. तसेच साखर कारखाना असलेले व चॉकलेट उत्पादन करीत असलेले रावळगांव शुगर व परिसरात बँविंग सेवा उपलब्ध करून देण्यासाठी रावळगांव येथे शाखा सुरू करण्यात आली. बँकेच्या एवूण ८ शाखा असुन बँकेचे कार्यक्षेत्र नासिक जिल्हा हे आहे. बँकेच्या सर्व शाखा संगणीकृत आहेत. याशिवाय बँक संपूर्ण भारतात डी. डी. सेवा पुरविते. ठेविदारांच्या सुरक्षिततेची बँक विशेष काळजी घेत असते. त्याकरीता बँवेने ठेविंचा विमा करून घेतलेला आहे. तसेच योग्य जागी गुंतवणूक व योग्य कर्ज वाटप हे बँकेचे खास वैशिष्ट्ये आहेत.
 

३१ मार्च २०१३ अखेर बँकेस १४९.६५ कोटी नफा झाला असून सभासद संखा २२,९४२ व वसुल भांडवल रू.५४०.६० लाख आहे. बँकेच्या रू. १७,७८७.०२ लाख ठेवी व रू. १२,६४३.४९ लाख कर्जे आहेत. बँकेचे खेळते भांडवल रू. २१,०८७.२९ लाख आहे व रू. ७,५२८.७४ लाख गुंतवणूक आहे.
 

वर
 
© Mamco Bank, Malegaon. 2007 Developed by SW-Logic Development