ऐतीहासीक व धार्मिक पाश्र्वभूमी लाभलेले पुर्वाश्रमीचे नांव माहुलीग्राम असलेले मालेगांव शहर हे २०.६० अक्षवृत्त आणि ७६.६० रेखावृत्त या दरम्यान वसलेले आहे. नासिक हा मालेगांव तालुक्याचा जिल्हा असून नासिक जिल्ह्याच्या उत्तरपुर्वेस नाशिक शहरापासुन १०८ कि.मी. अंतरावर आहे. मालेगांव पासुन ३५ कि.मी. अंतरावर मनमाड हे जक्शंन रेल्वे स्थानक आहे. मोक्षणी, मोक्षगंगा अथवा मोसम व गिरीपर्णा अथवा गिरणा ह्या सह्याद्रीच्या रांगेत उगम पावणार्‍या व पुर्वेकडे वाहणार्‍या दोन नद्या मालेगांव शहरास स्पर्श करुन जातात. गिरणा नदी गावाच्या दक्षिण बाजुकडे व मोसम नदी पूर्णपणे गावाच्या मध्य भागात आहे. मालेगांवच्या पुर्व भागात झाजेंश्वर क्षेत्राजवळ दोन्ही नद्यांचा संगम होतो व पुढे वाहणार्‍या नदीस गिरणा असे संबोधण्यात येते.
 

ऐतिहासीक पाश्र्वभूमी असलेले माहुलीग्राम म्हणजेच मालेगांव शहर आणि परिसरात इ.स. १००० मध्ये राष्ट्रकुट घराण्याची सत्ता होती. अठराव्या शतकापर्यंत समृद्धतेने नटलेला व शांत असा हा परिसर विविध कारणाने अशांतच राहिला. पुणे जिल्ह्यातील सासवडच्या दाणी घराण्यातील नागोशंकर राजेबहाद्दर यांना नानासाहेब पेशव्यांनी इ.स.१७६० पुर्वी निंबायती परगण्यातील

निंबायत व भोवतालच्या मुलखाची जाहगिरदारी दिला. प्रारंभीच्या काळात नागोशंकर हे अहमदाबाद येथील बादशाहच्या सैन्यातील इ.स.१७५५ मधील सर्वात तरबेज सेनापती होते. त्यांना विशेष कामगिरी केल्याबद्दल बादशाहने मालेगांव व परिसरातील खेडी इनाम दिली. नागोशंकर यानी इ.स.१७४० ते १७६५ मध्ये मालेगांवचे वैभव असलेले ऐतिहासीक भुईकोट किल्ला बांधला. पुढे इ.स. १८१८ मधे ब्रिटीशांनी हा किल्ला मिळवून सत्ता ताब्यात घेतली. त्यानंतर स्वातंत्र्य पुर्व काळात मालेगांव व परिसरात अनेक घडामोडी होत गेल्या सन १८६३ मध्ये मालेगांवात नगरपालिका अस्तित्वात आली व १७.१२.२००१ मधे नगरपालिकाचे महानगरपालिकेत रूपांतर झाले.

 

मालेगांव हे प्रामुख्याने दाट लोक वस्तीचे गांव असून येथील लोकसंख्या अदमासे ५ लाख आहे. मालेगांव शहरात प्रामुख्याने मुस्लीम लोकसंख्या व त्यापाठोपाठ हिंदू लोकसंख्या आहे. येथील अधिक वर्ग मध्यमवर्गीय असून विणकाम हा मुख्य व्यवसाय आहे. येथील रंगीत साडी हा व्यवसाय प्रसिद्ध व्यवसाय आहे. मालेगांव हे व्यावसायिकांचे गांव आहे. तसेच तालुक्यातील शेती हा प्रमुख व्यवसाय आहे. शहरातील प्रमुख व्यवसाय पावरलुम असल्यामुळे या शहरात सीटी ऑफ पावरलुम असे म्हटले जाते.
 

मालेगांवत जवळपास २५ बँका व १० पतसंस्था असून ८ राष्ट्रीयकृत, ४ शेड्युल्ड, ६ सहकारी बँका आहेत तसेच जिल्हा बँकेच्या ६ शाखा येथे आहेत. शैक्षणिक क्षेत्रातही मालेगांव अग्रेसर असून येथे मोठ्या प्रमाणात सरकारी तसेच खाजगी शैक्षणिक संस्था आहेत.
 

याशिवाय मालेगांवास अनेक धार्मिक व ऐतिहासीक स्थळांची देण लाभली आहे. त्यात प्रामुख्याने चंदनपुरीचे खंडेराव दौलत, मालेगांवचा भुईकोट किल्ला, साल्लेर मुल्लेर येथील पर्वत व किल्ला, मालेगांव पासुन अवघ्या ३० किमी अंतरावर असलेले चांदवडचे रेणुकादेवी मंदिर व पर्यंटन स्थळ, गिरणा नदीवर असलेले गिरणा धरण, मांगितुंगी येथील जैन धर्म तिर्थ क्षेत्र, मालेगांव तालुक्यातील रावळगांव येथील रावळगांव शुगर फॉर्म व रावळगांव चॉकलेट, मालेगांव पासून अवघ्या ५ कि.मी. अंतरावर असलेले रोकडोबा मंदिर, मोक्षगंगेच्या काठी असलेले पुरातन महादेव घाट येथील महादेव मंदिर तसेच महाराष्ट्रातील सर्वात उंच १११ पुâट उंचीचा कळस असलेले महादेव व गणपती मंदिर याशिवाय मुस्लीम, शिख, खिस्ती धमियांचे विविध धार्मिक स्थळे येथे आहेत.

वर
 
© Mamco Bank, Malegaon. 2007 Developed by SW-Logic Development