मामको जनकल्याण ट्रस्ट

मालेगांव अर्थिक नाडी असलेल्या दि मालेगांव मर्चन्टस् को.  ऑप. बँकेने बँकेच्या रौप्य महोत्सवी वर्षात सन १९८७ साली मामको जन कल्याण ट्रस्टची स्थापना केली. सुरूवातीस बँकेने रू. २ लाख देवुन ट्रस्टची स्थापना करण्यात आली. हा ट्रस्ट स्थापन करण्याचा मूळ उद्देश सामाजिक बांधिलकी व बँकींग व्यवसाय व्यतिरिक्त सेवा देणे हा होता. गरीब व गरजू जनतेला वैद्यकिय सेवा अल्पदरात उपलब्ध व्हावी ही भावना ठेवून संस्थापक श्री हरिलालशेठ आस्मर यांनी स्थापना केली. बँकेच्या सभासंदानीही ट्रस्टसाठी उदार अंतकरणाने आपला २ वर्षाचा लाभांश देणगी म्हणून दिला. पुढे बँकेच्या नफ्यातील १० टक्के प्रमाणे रक्कम वाढत गेली. आधी फक्त अर्थिक परिस्थितीत नसलेल्यांना मोठया ऑपरेशन्ससाठी मदत दिली जात होती. पुढे ट्रस्टने अतिशय कमी कालावधीत दमदार विकास करीत १९९२ सालापासून अल्पदरात अ‍ॅम्बुलन्स सेवा तसेच वेळोवेळी रक्तदान शिबीर घेवून गरजू रुग्णांची सेवा केली. तसेच ट्रस्टतर्फे वेळोवेळी विविध उपक्रम राबविण्यात येतात. यात वेगवेगळया प्रकारचे शिबीर घेण्यात येतात. गरजू रूग्णांची अल्पदरात तपासणी करून गरजेचे असल्यास अल्पदरात शस्त्रक्रिया करण्यात येतात. याशिवाय सर्वरोग निदान शिबीर, स्त्रीरोग, दंतरोग, त्वचारोग, डायबेटीस, अशी वेगवेगळी शिबीरे आयोजीत करून ट्रस्ट मार्पâत गरजूंना सेवा पुरविण्यात येते.
 
दि.१८/०७/९७ पासून मामको जनकल्याण ट्रस्ट मार्फत शहरात कॉम्परोडवर सर्व सोईनी सुसज्ज २५ खांटाचे मामको जनकल्याण ट्रस्ट हॉस्पीटल सुरू केले. या हॉस्पीटल मध्ये दररोज अतिशय अल्पदरात रूग्णांची तपासणी व शस्त्रक्रिया केली जाते. यासाठी हॉस्पीटममध्ये तज्ञ डॉक्टर नेमण्यात आले आहेत. याशिवाय ट्रस्टने सुरू केलेला फिरता दवाखाना शहराच्या व आसपासच्या खेड्यात जावुन त्या-त्या भागातील रुग्णांची तपासणी व उपचार करीत असतात, हे कार्य अविरत चालू आहे.
 

ट्रस्टच्या वतीने समाजिक दृष्टीकोनातून दरवर्षी इयत्ता १० वी व १२ वीच्या परिक्षेत विशेष प्राविण्या मिळविण्या विद्याथ्र्यांना प्रोत्साहन देण्यासाठी समारंभ पुर्वक सत्कार करण्यात येतो. तसेच विचारवंताचे व्याख्यान व चर्चासत्र ट्रस्ट मार्पâत आयोजीत केले जातात. २६ जानेवारी २००१ रोजी गुजरात मध्ये झालेल्या प्रलंयकारी भुकंप ग्रस्तांच्या मदतीसाठी मामको जनकल्याण ट्रस्टच्या नेतृत्वाखाली बँकेचे संचालक शहरातील नामांकित डॉक्टर्स व औषधांचा साठा, अ‍ॅम्ब्युलन्स घेवुन गेले व विशेष मदत पुरविली.
 
मामको जन कल्याण ट्रस्ट रुग्णालयामार्पâत तज्ञ डॉक्टरांची मानद सेवा उपलब्ध करून देवुन त्याअंतर्गत सोनोग्राफी, आठवड्यातील एक दिवस त्वचारोग, अस्थीरोग, नाक, कान, घसा, बालरोग, मानसोपचार याची सेवा उपलब्ध करून देण्यात येते.
 

ट्रस्टतर्फे मालेगांवात प्रथमच शववाहिकेची सेवा सुरू केलेली आहे. दि. ८/९/०६ रोजी मालेगांवात झालेल्या बॉम्ब स्फोटांनंतर घटनास्थळी सर्वप्रथम ट्रस्टतर्फे अ‍ॅम्ब्युलन्स पाठवून मदत पोहचविण्यात आली व त्यानंतर वैद्यकिय सेवा व १०० रक्ताच्या बाटल्या पुरवून जखमीसाठी उपचार करण्यात आले. बाहेरगांवाहून आलेले पोलीसांची वेळोवेळी मोफत वैद्यकिय तपासणी करण्यात आली. यावेळी सर्व ट्रस्टी संचालक उपस्थित राहून भाग घेत असतात.
 
दरवर्षी मालेगांव तालुक्यातील धार्मिक तिर्थक्षेत्र असलेले श्रीक्षेत्र चंदनपुरी येथे खंडोबाची यात्रा भरते. सदर यात्रा १० दिवस असते. यात ट्रस्टमार्फत फिरत्या दवाखान्याद्वारे यात्रेकरूना मोफत सेवा उपलब्ध करून देण्यात येते. तसेच दरवर्षी श्रीक्षेत्र सप्तश्रुंगी गडावर पायी जाणार्‍या यात्रेकरूसाठी मोफत तपासणी व औषधोपचार करण्यात येतात.
 
असे अनेक वैद्यकिय, शैक्षणिक, सामाजिक कार्यक्रम मामको जनकल्याण ट्रस्टतर्फे राबवुन बँक बँकींग सेवे व्यतिरिक्त इतर कार्य करीत असते.

वर
 
© Mamco Bank, Malegaon. 2007 Developed by SW-Logic Development